महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ निवड स्पर्धा संपन्न – निवडी घोषित
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र केसरी पदासाठी खुल्या गटासाठी सह विविध वयोगटातील वजनासाठी संघाच्या निवडी आज दिवसभर अत्यंत चुरशीने आणि अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती माती आणि मॅट अश्या दोन्ही ठिकाणी मोतीबाग तालमीत पुर्ण झाल्या . खासदार प्रा . संजय मंडलिक यांनी या स्पर्धेचे उद्घाटन करून तालीम संघाच्या कामासाठी भरीव निधीचा मदतीचा धनादेश संचालकांच्या कडे सुपूर्त केला . या स्पर्धेतून खुल्या वजन गटातील महाराष्ट्र केसरी पदासाठी पृथ्वीराज पाटील ( देवताळे )संग्राम पाटील ( आमशी ) दोन्ही सेनादल यांची गादीवरील गटातून तर शिवम शिदनाळे ( दत्तवाड ) आणि अभय भिंगार्डे (बानगे – मोतीबाग तालीम ) यांची माती गटातून महाराष्ट्र केसरी पदासाठी निवड झालेली आहे . महाराष्ट्र केसरी पदाच्या लढतीसाठी हे चार मल्ल खुल्या वजन गटातून आपली कसब पणाला लावतील . य सह विविध वजन गटातील स्पर्धाही अत्यंत उत्साहाने रात्री उशिरा पर्यत पार पडलेल्या आहेत . उद्या त्या मधून अंतिम संघ निवड घोषणा केली जाणार आहे .आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या संघाच्या पूर्व तयारीला मोठा – व्यायामाला मोठा वेग येणार आहे . यजमान राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव खोत यांच्यासह विविध मान्यवर या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्यरत होते . होते .