Thursday, July 18, 2024
Home ताज्या रोमँटिक आणि आशयघन असा 'एकदम कडक' चित्रपट २ डिसेंबरला होणार सर्वत्र प्रदर्शित

रोमँटिक आणि आशयघन असा ‘एकदम कडक’ चित्रपट २ डिसेंबरला होणार सर्वत्र प्रदर्शित

रोमँटिक आणि आशयघन असा ‘एकदम कडक’ चित्रपट २ डिसेंबरला होणार सर्वत्र प्रदर्शित

तरुणाईला भुरळ पाडायला ‘एकदम कडक’ चित्रपट २ डिसेंबरला येणार चित्रपटगृहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे, या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन असा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत आणि ‘शुभम फिल्म प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या ‘एकदम कडक’ या चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने हे कलाकार पडद्यावर धुडगूस घालायला सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि नृत्यांगना मानसी नाईकच्या ‘मॅडम कडक हाय’ या गाण्यावरील दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे.
आकर्षक आणि आशयघन अशा या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकदम कडक नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे येत्या २ डिसेंबरला सिनेमागृहात पाहणे रंजक ठरेलच. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत आणि ‘शुभम फिल्म प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन आणि उमेश गवळी यांनी सांभाळली आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत. तर चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.
‘एकदम कडक’ चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि गाणी पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही, आता प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments