Sunday, July 14, 2024
Home ताज्या संविधान दिनानिमित्त शनिवारी रॅली मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

संविधान दिनानिमित्त शनिवारी रॅली मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

संविधान दिनानिमित्त शनिवारी रॅली मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

कोल्हापूर दि .२४ (जिमाका) : संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार असून सकाळी ८.३० वाजता बिंदू चौक येथून निघणाऱ्या या रॅलीत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- कोल्हापूर महानगरपालिका – गगांराम कांबळे यांची समाधी असे मार्गक्रमण करुन पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातून- दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारोप होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ८.३० बिंदु चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर रॅली निघेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments