आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम- पंचमहाभूत महोत्सव’ च्या बोध चिन्हाचे आज मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : १३५० वर्षापेक्षा अधिक आध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्य्यावातीने २० ते २६ फेब्रुवारी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सुमंगलम’ या पृथ्वी, पाणी,हवा, तेज,आकाश अशा पंचमहाभूतांच्यावर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या बोध चिन्हाचे अनावरण पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक २५/११/२०२२ रोजी दुपारी ४ वाजता मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पंचगंगा घाट येथे होणार आहे.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.अशी माहिती डॉ. संदीप पाटील यांनी दिली.यावेळी माणिक पाटील चुयेकर उपस्थित होते.
यावेळी पर्यावरणाला पूरक अशा हजारो गोमय पंथी प्रज्वलित करून या भव्य उत्सवाच्या तयारीचे मुहूतमेंढ रोवण्यात येणार आहे. पंचमहाभूत तत्त्वांची संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व उत्सव थीम सोंगंचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवाय हा अनावरण सोहळा जगभरामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे या उत्सवाच्या बोधचिन्हाची निर्मिती स्वच्छता अभियान लोगोचे निर्माते अनंत खासबागदार व शिरीष खांडेकर यांनी केली आहे.
साधारणतः ५००एकर जागेमध्ये होणाऱ्या या उत्सवाला जगभरातून विविध मान्यवर व सुमारे ३० लाख लोकांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे स्वरूप असणार आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला शंकर पाटील, डॉक्टर रवींद्र सिंग, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.