Wednesday, October 9, 2024
Home ताज्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध स्पर्धा...

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसह समर्थकांकडून जल्लोषाने साजरा करण्यात येतो. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय श्री.राजेश क्षीरसागर यांनी घेतला होता. परंतु, यावर्षी शिवसैनिकांच्या उत्साहाने आणि जल्लोषी वातावरणात आपल्या लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी राजकारणापेक्षा समाजकार्याला अधिक महत्त्व देत शहरात विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२३ नोव्हेंबर रोजी शिवसेना विभाग गंगावेश यांच्यावतीने दुधाळी मैदान परिसरात गाडीसोबत श्वान पळविण्याच्या स्पर्धा, शिवसेना शाखा जोशी गल्ली यांच्या वतीने जोशी गल्ली कॉर्नर येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा, शिवसेना विभाग जुना बुधवार पेठ यांच्यावतीने महिलांसाठी रांगोळी व संगीत खर्ची स्पर्धा व सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम, शिवसेना विभाग शनिवार पेठ यांच्या वतीने खोलखंडोबा हॉल येथे कॅरम स्पर्धा, शिवसेना विभाग यादवनगर यांच्यावतीने डोळे, कान, नाक, घसा तपासणीचे आरोग्य शिबीर, शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्या वतीने रंकाळा तलाव येथे पतंग स्पर्धा असे कार्यक्रम पार पडणार आहेत.
दि.२४ नोव्हेंबर रोजी शिवसेना विभाग मंगळवार पेठ यांचे वतीने मिरजकर तिकटी येथील अंधशाळेतील मुलांना स्नेहभोजन, राजारामपुरी विभागाच्या वतीने पांजरपोळ येथे गोमाता पूजन आणि जनावरांना चारा वाटप, युवा सेनेच्या वतीने आई अंबाबाई आणि श्री जोतीबा आणि शिवसेना विभाग कसबा बावडा यांच्या वतीने ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे महाअभिषेक आणि साकडे घालण्यात येणार आहे. सी.पी.आर. कर्मचारी सेनेच्या वतीने सी.पी.आर. रुग्णालयातील रुग्णांना फळेवाटप, शिवसेना विभाग शुक्रवार व उत्तरेश्वर पेठ यांच्या वतीने गोरगरिबांना चादर व भोजन वाटप, संभाजी नगर विभागाच्या वतीने रेसकोर्स नाका येथे आरोग्य शिबीर, शिवसेना विभाग लक्षतीर्थ वसाहत यांचेवतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप, शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्यावतीने पतंगासह आकाशदिवे स्पर्धा, शिवसेना विभाग मुक्त सैनिक यांच्या वतीने स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धा, शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्यावतीने “कोण होणार वल्डकप विजेता” लकी ड्रॉ स्पर्धा, प्रबोधनकार ठाकरे बालसंकुलास रु.१० हजारांची मदत, अपंग व्यक्तींना सायकल प्रदान करण्यात येणार आहे.
दि.२६ नोव्हेंबर रोजी शिवसेना शाखा नंगीवली तालीम यांच्या वतीने गडकरी हॉल, पद्माळा गार्डन येथे पोलीस भरती प्रशिक्षण पूर्व मार्गदर्शन शिबीर व परीक्षा, दि.२७ नोव्हेंबर रोजी राजारामपुरी विभागाच्या वतीने स्केटिंग स्पर्धा, शिवसेना शाखा लाड चौक मंगळवार पेठ यांच्या वतीने बकऱ्यांच्या टकरी स्पर्धा, शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ यांच्या वतीने आरोग्य शिबीर आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
यासह यापूर्वी दि.२० नोव्हेंबर रोजी शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्या वतीने म्हैस पळविण्याच्या आणि लाईट स्ट्रक्चर स्पर्धा, शिवसेना विभाग कसबा बावडा यांच्यावतीने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा पार पडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments