केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीय) २४ व २५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर/प्रतिनिधी : देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे. त्याअंतर्गत भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदार संघात प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे करण्यात येणार आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने
आता या योजनेची राज्याची जबाबदारी (प्रदेश संयोजक) मावळचे माजी आमदार तथा माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
याच धर्तीवर कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या प्रवासासाठी केंद्रीय मंत्री ना.ज्योतीरादित्य सिंधिया हे दिनांक २४ व २५ रोजी नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २४ रोजी सकाळी १०.१५ वाजता विमानतळ येथे आगमन होणार आहे. सकाळी ११ वाजता शाहू महाराज स्मृतिस्थळ याठिकाणी होणाऱ्या विकासकामांना भेट देतील.
यानंतर हॉटेल अयोध्या याठिकाणी विधानसभा मतदार संघातील नेते व पदाधिकारी, आघाडी-मोर्चा पदाधिकारी यांच्यासोबत संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत.यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.दुपारच्या सत्रामध्ये शहरातील ५ बूथवर भेट, विशेष पुरस्कार प्राप्त बिभीषण पाटील यांची भेट, मिरजकर तिकटी शैर्य स्मारक भेट सायंकाळी ६ वाजता अमृतसिद्धी हॉल कळंबा याठिकाणी महिला मोर्चाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ७.३० वाजता कागल हाऊस, नागाळा पार्क याठिकाणी पत्रकार बांधवांसोबत वार्तालाप करणार आहेत.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन,राम मंदिर कागल याठिकाणी १०.३०वाजता समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत चर्चासत्र मध्ये सहभागी होतील.
सकाळी ११.३०वाजता शाहू हॉल कागल याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांच्यासोबत बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी १२.३० वाजता शाहू शुगर मिल ऑफिस बिल्डिंग याठिकाणी केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांसोबत मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.३० वाजता विविध समाजाच्या लोकांच्यासोबत भोजन करणार आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दौऱ्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या दौरा यशस्वी होण्यासाठी
धनंजय महाडिक,सुरेश हाळवणकर,
राजे समरजीतसिंह घाटगे,राहुल चिकोडे,अमल महाडिक,नाथाजी पाटील,अशोक देसाई,महेश जाधव,
सुनील मगदूम,विजय जाधव, सौ अरुंधती महाडिक यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात आले आहे.