कोल्हापूर शहर महिला काँग्रेस पदाधिकारीकडून श्रद्धा वालकर घटनेबाबत पुनावालाचा निषेध
कोल्हापूर/प्रतिनिधी : नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची आफताब पुनावाला याच्याकडून निर्गुण हत्या केली आणि तिचे तुकडे करून पुनावाला याने सहजपणे त्याची विल्हेवाट लावली. समाजातील या अतिशय वाईट आणि घृणास्पद कृत्याबद्दल तिरस्कार आणि निषेध व्यक्त करत त्या गुन्हेगार आफताब पुनावाला याला अतिशय तातडीने कठोर शिक्षा झालीच पाहिजे व समाजातील किशोरवयीन मुला मुलींना प्रबोधनाची गरज आहे. समाजात जनजागृती ही झाली पाहिजे या विषयी कोल्हापूर शहर महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी आवाज उठवत जिल्हाधिकारी मा. रेखावत यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिले. व जलदगती न्यायालयात केश चालवून कठोरात कठोर शिक्षा व्हावी श्रध्दा वालकर व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
हे निवेदन देतेवेळी सरलाताई पाटील, वैशालीताई महाडिक, शुभांगी साखरे. मंगल खुडे, सविता रायकर, पंचशीला साळवी, सुमन ढेरे, पूजा भोसले पुनम हवालदार.प्रियांका देसाई आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होत्या.