कोल्हापूर महापालिकेसमोर र्चोथ्या दिवशी घुगुळ नाचवून ‘ आप पक्षाने केला जागर
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरात होणारे रस्ते दर्जेदार व टिकाऊ व्हावेत यासाठी महापालिकेने क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करावा, वॉर्ड निहाय नागरिकांची रस्ते दक्षता समिती करावी, शंभर कोटींच्या रस्ते विकास निधीसाठी पाठपुरावा करावा आदी मागण्या घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने ‘जागर’ आंदोलन आयोजित केलेले आहे.
या जागर आंदोलनाचा चौथ्या दिवशी महापालिकेसमोर घुगुळ नाचवून आंदोलन करण्यात आले. हलगीच्या ठेक्यावर घुगुळ नाचवत दर्जेदार रस्त्यांसाठी जागर करण्यात आला.
जागर आंदोलनातील आजच्या कार्यक्रमाचे नियोजन सूरज सुर्वे आणि सचिन वणिरे यांनी केले.
दरम्यान आंदोलनातील मागण्यांसाठी ‘आप’च्या प्रशासनासोबत बैठका सुरू आहेत, परंतु अद्याप मागण्यांवर ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलन सुरू आहे. आज सायंकाळी महापालिका प्रशासन व ‘आप’ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे.
रस्त्यांचा क्वालिटी कंट्रोल प्लॅन, स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, रस्ते दक्षता समिती व शंभर कोटींच्या रस्ते निधीबाबत ठोस कार्यवाही मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
जागरच्या चौथ्या दिवशी
मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, विजयराव पाटील, राष्ट्रीय लोक जन शक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले, प्रहारचे समाधान हेगडे, शिवसेनेचे कमलाकर किलकिले, वंचितबहुजन आघाडपडित पंडित कांबळे, शहरातील विविध बचत गट, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटना अनिल साळुंखे, शुभम शिरहट्टी यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी येवून पाठींबा दिला
यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, अभिजीत कांबळे, अमरजा पाटील, डॉ. उषा पाटील, पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, ऍड.चंद्रकांत पाटील, प्रकाश सुतार, अभिषेक पाटील, डॉ. कुमाजी पाटील, विजय हेगडे भाग्यवंत डाफळे, शशांक लोखंडे, रविन्द्र राऊत, मयूर भोसले, रवींद्र ससे, आनंदराव चौगुले, सचिन वणीरे, अमरसिंह दळवी, रवींद्र पंदारे, लाला बिरजे, विजय भोसले, मुद्दसर दाढीवले, बाबुराव तोरसकर, मंगेश मोहिते, संजय नलावडे, प्रभाकर चौगुले, प्रकाश हरणे, शुभंकर व्हटकर, आदी उपस्थित होते.