करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची सातव्या दिवशी श्री सरस्वती देवी रुपात अलंकार पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुद्ध सप्तमी शके १९४२ शार्वरी नाम संवत्सर शुक्रवार २३ऑक्टोबर २०२० करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची श्री सरस्वती देवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती.
अश्विन शुद्ध सप्तमी शुक्रवारी आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अगस्ती कलोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की करवीर निवासिनीच हे मंदिर त्रिकूट प्रासाद म्हणून ओळखलं जातं हे मंदिर फक्त एकट्या महालक्ष्मीचे नसुन महाकाली आणि महासरस्वती या तिघींच आहे.
तिघींचे तीन स्वतंत्र मंडप गाभारा आणि प्रदक्षिणा युक्त मंदिर आहे. आज या मंदिरात दक्षिणाभिमुख महाकाली ची विराजमान मूर्ती ही चतुर्भुज महिषासुरमर्दिनी रुपात आहे जी करवीरची शक्तीपीठ देवता आहे महाष्टमीचा होम हिच्यासमोरच संपन्न होतो. तर महासरस्वती ची मूर्ती ही चतुर्भुज आणि बैठी असून अभय अंकुश पाश वरद अशी आयुधे व मुद्रा धारण करते.
या तिघींचेही दर्शन महर्षि अगस्तींनी घेतले होते करवीरच्या क्षेत्र स्वामिनीबरोबरच तिच्या या दोन प्रधान प्रकृतींचेही आपण यथासांग पूजन करून त्यांची कृपा प्राप्त करू हिच अपेक्षा
असा या पूजेचा अर्थ आहे.