संभाजी ब्रिगेड – जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून ऊसतोड मजुरांना सोबत दिवाळी साजरी*
कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल किंवा जिजाऊ ब्रिगेड असेल, यांच्याकडून नेहमीच कौतुकास्पद आणि गरजेच्या ठिकाणी सहकार्य होत असतं. आज संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने ऊसतोड कामगार वस्तीवर दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा असतो. मात्र काही लोकं आपलं गाव, घर, शहर सोडून परमुलखात रहायला येतात, ते काही आनंदाने नव्हे तर कामाच्या शोधात आणि पोटाची आग विझवण्यासाठी त्यांना गाव सोडावा लागतो.
अशीच बावड्यातील राजाराम कारखाना याठिकाणी याठिकाणी मुक्कामी असणारी ऊसतोड कामगारांची अनेक कुटूंब आज प्रत्यक्षात पाहिली, त्यांची विचारपूस करून त्यांचा जीवनक्रम जाणून घेतला.
मूळची बीड जिल्ह्यातील राहणारी ही लोकं, कोरडवाहू शेती, शेतीतील उत्पन्न कापूस, गहू, ज्वारी.
मात्र ही शेती पावसाच्या पाण्यावर पिकणारी बिन भरवशाची शेती. त्यावर कुटूंबाची गुजराण होत नाही म्हणून हे लोक आपली बायका पोरं घेऊन ऊस तोडीचं काम करतात, अगदी लहान लहान मुलांसोबत कोणत्याही सोइ सुविधांशिवाय झोपडीत राहतात. त्यांना दोन वेळच्या जेवणाची काळजी असताना दिवाळी कुठून साजरी करणार.
आज संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने या लोकांना सहाशे ते सातशे किलो फराळ वाटप करण्यात आला, त्यावेळी विशेषतः लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय होता….
या वेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक सुयोग औंधकर मराठा सेवा संघ विभागीय उपाध्यक्ष अश्विन वागळे संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक निलेश सुतार जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष चारुशीला पाटील संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अभिजीत भोसले जिल्हा कार्याध्यक्ष भगवान कोइंगडे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता रंजना पाटील पन्हाळा तालुका अध्यक्ष दत्तात्रय चौगुले विश्वास गायकवाड
अमर पाटील राहुल पाटील अक्षय पाटील मदन परीट विकास भिऊनगडे, ओमकार जाधव अनिकेत पाटील अभिनंदन घोलपे कल्पना देसाई आदित्य सकट दर्शन शहा व कार्यकर्ते उपस्थित होते.