गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे पनवेलला गझल सादरीकरण स्पर्धा
नवी मुंबई, दि. २७ गझल मंथन साहित्य संस्था व नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी तर्फे पनवेल येथे दि. ९ ऑक्टोबर रोजी स्वरचित गझल सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेतील विजेत्या गझलकारांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस दिले जाईल. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप राहील. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे व जनार्दन म्हात्रे करणार आहेत. गझल सादरीकरण स्पर्धा दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात रंगणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी रवींद्र सोनवणे (9096873678), मनाली माळी (8097231666), स्मिता गांधी (9323489693) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे व नवी मुंबई जिल्हा कार्यकारीणीने केले आहे.