आजच्या पहिल्या दिवशी देवी अंबाबाईची (महालक्ष्मी)ची सिंहासनाधीश्वरी या रूपात
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रतिपदेच्या दिवशी नवरात्र अनुष्ठान प्रारंभ होतो. आजच्या पहिल्या दिवशी देवी अंबाबाईची (महालक्ष्मी)ची सिंहासनाधीश्वरी या रूपात पूजा ही बांधण्यात आली होती.
श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकःनवरात्र म्हणजे फक्त देवीचा आनंद उत्सव नसतो तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व. हे अनुष्ठान आहे अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता.ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणं गरजेचं असतं आणि इथं अनुष्ठानं तर श्रीमद सिंहासनेश्वरीचे आहे भगवतीच्या अनेक नावांपैकी एक हे ललिता सहस्त्रनामातील देवीचे नाव . साधारणपणे माणसाच्या विभूतीच्या नावाआधी श्री हे उपपद लागतं परंतु देवीच्या सिंहासनाच्या नावाआधी श्री उपाधी लावली जाते याचं कारण ती ज्या आसनावर विराजमान आहे ते आसनच मुळात सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कर्ते असणाऱ्या त्रिदेवांच्या आधाराने तयार झाले आहे त्यामुळे जगदाद्य शक्ती अशी करवीर निवासिनी या आजच्या पूजेमध्ये सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा स्वरूपाची आजची पूजा सिंहासनाधीश्वरी या रूपात साकारली आहे. अशी ही आजची पूजा अनिलराव कुलकर्णी आशुतोष कुलकर्णी श्रीनिवास जोशी व गजानन मुनीश्वर यांनी साकारली आहे