Saturday, July 13, 2024
Home ताज्या दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू - श्री.राजेश क्षीरसागर

दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू – श्री.राजेश क्षीरसागर

दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू – श्री.राजेश क्षीरसागर

हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने घेतली श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे. हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. कोल्हापूर शहर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महानगरपालिकांची हद्दवाढ झाल्यानेच याशहराशेजारील गावांचा विकास होवून शैक्षणिक, वैद्यकीय सेवेसह मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या आहेत. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावित केलेल्या गावांचा विरोध होत असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे. विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही. दोन्ही समित्या या कोल्हापूर जिल्ह्यातीलच असून, विकासाच्या बाजूने एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही समित्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून त्यांची संयुक्तिक समिती स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील आहे. हद्दवाढ विरोधी समितीच्या मागणीप्रमाणे प्रस्तावित हद्दवाढीचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांना भेटून या विषयावर सकारात्मक तोडगा काढू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावांमधील सर्व पक्षीय कृती समिती, कोल्हापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
यावेळी भूमिका मांडताना हद्दवाढ विरोधी समितीचे राजू माने म्हणाले, गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे. हद्दवाढीस समितीचा विरोध नाही. पण, प्रस्तावित गावातील लोकांची भूमिका समजून न घेता होणाऱ्या हद्दवाढीस या गावांचा विरोध आहे. सद्या प्रस्तावित हद्दवाढीतील अनेक गावांनी गाव बंद आंदोलनाची चळवळ सुरु केली आहे. यामुळे शहरासह गावातील नागरिकांचेही नुकसान होत आहेच. पण, निर्णय लादला जाण्याच्या शक्यतेमुळे हा विरोध तीव्र होत आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी इतर विकसित झालेल्या शहरांचा अभ्यास करून ग्रामीण भागातील जनतेसमोर आराखडा सादर करावा, हीच समितीची प्रमुख मागणी असल्याचे सांगितले.
यावर बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेवूनच हा प्रश्न सुटणार आहे. हद्दवाढी शिवाय विकास होणार नाही, हे सत्य आहे. विकास झाल्यास शासनाकडून निधी मंजूर करून गावांचाही विकास व्हावा. ग्रामीण भागातील जनतेलाही शहराप्रमाणे मुलभूत सोईसुविधा मिळाव्यात ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही बाब चुकीची आहे. शांत विचाराने विचारांची देवाणघेवाण करून दोन्ही समित्यांची संयुक्तिक बैठक होणे गरजेच आहे. हद्दवाढ झाल्यास आवश्यक निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहेत. त्यामुळे सर्वानुमते हा निर्णय व्हावा. नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये या करिता दोन्ही समित्यांनी टोकाची भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. लवकर मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेवून दोन्ही बाजूची भूमिका त्यांच्या समोर मांडू. यासह हद्दवाढीचा आराखडा सादर करण्याबाबतही चर्चा करून दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू, असे सांगितले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विभागप्रमुख मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, रुपेश इंगवले, कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावांमधील सर्व पक्षीय कृती समितीचे बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्ह्त्रे, शशिकांत पाटील, गजानन संकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने मंजुळा जाधव सन्मानित कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुळा जाधव यांना इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे (इम्सा) आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थित मंजुळा जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंजुळा जाधव म्हणाल्या, सिम्बॉलिकचे गीता पाटील व गणपतराव पाटील यांनी दाखवलेला विश्वास, सर्व सहकारी शिक्षकांनी दिलेली साथ यांच्यामुळेच चांगल्या पद्धतीने काम करता आले. या कामाची दखल घेत इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने हा पुरस्कार दिला. मला मिळाला हा सन्मान फक्त माझा नसून संपूर्ण सिम्बॉलिकच्या टीमचा आहे. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकुडे, क्रेडोच्या सीईओ मृदुला श्रीधर आदी प्रमुख उपस्थित होते.
Next articleआजच्या पहिल्या दिवशी देवी अंबाबाईची (महालक्ष्मी)ची सिंहासनाधीश्वरी या रूपात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments