कागलमधील विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची उपस्थिती
कागल/प्रतिनिधी : कागल शहरातील श्री. शिवाजी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था, श्री.हसन मुश्रीफ सहकारी दूध व्याव. संस्थां, छत्रपती संभाजी कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था, छत्रपती शाहू सहकारी उपसा जलसिंचन संस्था या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साहात संपन्न झाल्या. या संस्थांच्या सर्वसाधारण सभेसाठी माजी ग्रामविकास व कामगार मंत्री, आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, समाजाच्या आर्थिक जडणघडणीत सहकारी संस्था आर्थिक पाठबळ देतात. “सहकारातून सामान्य जनतेची समृद्धी” हा वसा सहकारी समूहात अधिक कार्यक्षमपणे चालवण्यासाठी आपण कार्यरत राहावे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून या संस्थांना सर्वतोपरी मदत करणार त्याचबरोबर देशभरात थैमान घातलेल्या लंम्पी या रोगाची लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाईल, आमदार मुश्रीफ यांनी सांगितले
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, श्रीनाथ समूहाचे प्रमुख चंद्रकांत गवळी, पी. बी. घाडगे सर, नवल बोते, यांच्यासह सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी, सतीश घाडगे, अशोक जकाते, इरफान मुजावर, दिलीप जांभळे, प्रशांत घाटगे, भगवान कांबळे, सुरेश शिंदे, गणेश कांबळे, शानूर पखाली,अशोक वड्ड, लियाकत मकानदार आदीसह सभासद व कर्मचारी मान्यवर उपस्थित होते. श्री.शिवाजी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या कागलचे चेअरमन राजेंद्र गोनुगडे, छत्रपती संभाजी विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह जाधव श्री. हसन मुश्रीफ दूध संस्थेचे चेअरमन मनोहर गुरव, शाहू पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन शिवाजी भगले आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत सौरभ पाटील यांनी केले आभार अजित निंबाळकर यांनी मानले.