Friday, September 20, 2024
Home ताज्या अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार 'आर यु ब्लाइंड?'

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार ‘आर यु ब्लाइंड?’

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार ‘आर यु ब्लाइंड?’

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी रंगभूमीला आशयघन नाटकांची थोर परंपरा लाभली आहे. मनोरंजनासोबतच डोळ्यांत अंजन घालणारी नाटकंही मराठी नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. नाटक हे अभिव्यतीच उत्तम माध्यम म्हणून अनेक नाटककार नाटकाकडे पाहत असतात. अनेक नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडत असतात. समाजात वैचारिक क्रांती घडवणाऱ्या या नाटकांच्या यादीत आता आणखी एका नाटकाची भर पडणार आहे. ‘आर यु ब्लाइंड?’ असा सवाल करत एक नवं कोर नाटक मराठी पुण्यातल्या यशस्वी प्रयोगानंतर आज १६ सप्टेंबर सायं. ७.०० वा. केशवराव भोसले नाटय़गृह, कोल्हापूर. १७ सप्टेंबर, दुपारी ४.३० वा. भावे नाट्य मंदीर, सांगली तर १८ सप्टेंबर सायंकाळी ७.०० वाजता शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘आर यु ब्लाइंड?’चे प्रयोग होणार आहेत.
चार्ली स्टुडिओ निर्मित आणि मिलाप प्रस्तुत ‘आर यु ब्लाइंड?’ विशाल कदम यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे नाटक समाज कसा विघातक होत चाललाय, दिशाहीन बनत चालला आहे, आपण या देशाचे उत्तम नागरिक होण्यापेक्षा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होऊन आपलच कस नुकसान करत आहोत, सगळ्याच धर्मांचा धार्मिक उन्माद, विचारवंतांच्या हत्या हे सगळ आपल्याला कुठे घेऊन निघालय, यावर हे नाटक सडेतोड भाष्य करत. या नाटकाचं दिग्दर्शन विक्रम-प्रणव या जोडगोळीने केलं आहे. आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात, पण आपल्याच विश्वात रमलेले आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. डोळ्यावर पट्टी बांधून जगत राहतो, ही खरेतर आपल्यातल्या माणुसपणाची आपणच केलेली हत्या आहे. हे दर्शवणार या नाटकाच पोस्टर देखील प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतय. राजकारणाचा घसरलेला दर्जा, सोशीयल मिडियामधून माहिती घेऊन स्वतःला ज्ञानी समजणारे आजचे तरुण हे या समाजासाठी किती घातक आहे, हे दाखऊन देणार, कुठल्याही गोष्टीकडे बघताना आपल्याला जस सांगितल जातय, जे दाखवल जातय, ते तसच आहे का? याचा व्यापक विचार आपण प्रत्येकानेच करायला हवा, आपली सदसद्विवेक बुद्धी वापरायला हवी हे सांगणार, विकास म्हणजे नेमक काय? हा विकास आपल्याला विनाशाकडे तर घेऊन जात नाहीये ना, याचा विचार करायला प्रवृत्त करणार,कार्यकर्ते होऊन राजकीय पक्षांचे गुलाम होण्यापेक्षा, एक मतदार म्हणून आपण सत्तेत असणाऱ्या पक्षाला प्रश्न विचारले पाहिजेत, मग तो पक्ष कोणताही असो तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण एक चांगला समाज निर्माण करू शकू, याची जाणीव करून देणार हे नाटक आहे.
डॉ. रमेश खाडे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. विक्रम पाटील, प्रणव जोशी आणि सागर पवार हे कलाकार नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नेपथ्य देवाशीष भरवडे यांनी केलं असून, संगीत संकेत पाटील यांनी दिलं आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना केली आहे आणि नाटकाचे पोस्टर कनक चव्हाण यांनी केले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments