Tuesday, July 23, 2024
Home ताज्या व्यापारी वर्गाला भेडसावणारे विविध प्रश्नासंबंधी आमदार व शासकीय अधिकारी यांचेसोबत -व्यापारी-उद्योजकांची बैठक...

व्यापारी वर्गाला भेडसावणारे विविध प्रश्नासंबंधी आमदार व शासकीय अधिकारी यांचेसोबत -व्यापारी-उद्योजकांची बैठक संपन्न

व्यापारी वर्गाला भेडसावणारे विविध प्रश्नासंबंधी आमदार व शासकीय अधिकारी यांचेसोबत -व्यापारी-उद्योजकांची बैठक संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी :  परवाना फी व परवाना फेरफार फी बाबत तसेच परवाना विभाग व फायर विभाग वेगळा करणे, तावडे हॉटेल परिसरातील ट्रक टर्मिनल व व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्डा सुरू करणे, दसरा दिवाळी सणामध्ये महाव्दार रोड बंद करू नये, टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले- आऊट करावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार सतेज पाटील, आमदार ॠतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांचेकडे निवेदनाव्दारे केली. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन ने औद्योगिक संघटना व चेंबरच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेसोबत बैठक बोलावली होती. यावेळी महापालिकेचे अधिकारी, MSEB अधिकारी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर अधिकारी यांचेकडून करवून घेतले. विशेषतः परवाना विभाग व फायर विभाग वेगळा करणे, ट्रक टर्मिनल ताबडतोब सुरू करणे, दसरा दिवाळी मध्ये महाव्दार रोड बंद करू नये आणि टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले-आऊट करण्यासंदर्भात त्यांनी विशेष लक्ष देण्याचे अधिका-यांना सांगितले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संचालक अजित कोठारी उपस्थित होते. टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले-आऊट करण्यासंदर्भात त्यांनी बैठकीत अधिका-यांना फोन लावून तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments