Tuesday, July 23, 2024
Home ताज्या श्री शिव शाहूंचे विचार देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी मी सदैव...

श्री शिव शाहूंचे विचार देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध – संभाजीराजे छत्रपती

श्री शिव शाहूंचे विचार देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध – संभाजीराजे छत्रपती

बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी :  बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. बिहारची राजधानी पटना येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उत्तर भारतातून संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ बाबासाहेब आंबेकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर एल चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ७५ वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली होती. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले जावे, अशी समाजबांधवांची मागणी यावेळी संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात उध्दृत केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून परतत असताना पटना येथे आले होते, अशी येथील बांधवांची श्रद्धा आहे. आज साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपतींचे वंशज पटना येथे आले म्हणून त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देखील आपले कार्यक्षेत्र सोडूनही देशभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांना “राजर्षी” ही उपाधी उत्तरप्रदेशातील कानपूर येथील कुर्मी समाजाने दिली होती.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या देशभरातील अनेक संस्था संघटनांकडून मला वेळोवेळी बोलावले जात असते. यापूर्वी देखील मी उत्तर प्रदेश मधील लखनऊ, कानपूर तसेच मालदा – पश्चिम बंगाल, हैद्राबाद अशा ठिकाणच्या सामाजिक कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो आहे. श्री शिव शाहूंचे विचार देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments