Tuesday, July 23, 2024
Home ताज्या महापालिकेची तब्बल दीड कोटींची फसवणूक - माजी उप महापौर भुपाल शेटे यांची...

महापालिकेची तब्बल दीड कोटींची फसवणूक – माजी उप महापौर भुपाल शेटे यांची पत्रकार परिषदेत माहिती

महापालिकेची तब्बल दीड कोटींची फसवणूक – माजी उप महापौर भुपाल शेटे यांची पत्रकार परिषदेत माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेचे तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक संजय शिवाजीराव भोसले यांनीच कोल्हापूर महानगरपालिकेची तब्बल दीड कोटींची फसवणूक केली आहे.त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आज पत्रकार पतिषदेत केली आहे.त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे फौजदारी याचिका दाखल केली आहे.सलग नऊ वर्षे जनतेच्या पैशांची लूट करुन कोल्हापूर महापालिकेची तब्बल दीड कोटींची फसवणूक करुन दिशाभूल करणाऱ्या भ्रष्ट कर्मचारी संजय भोसले याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीही मागणी माजी उप महापौर भुपाल यांनी यावेळी केली आहे.            या प्रकरणी दोषी असणारे महापालिका अधिकारी, कर्मचारी व मिळकतदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी शेटे यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिकाही दाखल केली आहे.यावेळी भूपाल शेटे म्हणाले की, “कोल्हापूर महापालिकचे घरफाळ्याचे ३ कोटी १८ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले म्हणून तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, घरफाळा विभागाचे अधिक्षक नितीन नंदवाळकर, अनिरुध्द शेटे, कनिष्ठ लिपिक विजय खातू या सर्वांना मनपा आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी प्रथम निलंबित करून.                                                  त्यांच्यावर फौजदारी कारवाई करुन गुन्हा नोंद करण्याचे आदेश तत्कालीन करनिर्धारक संग्राहक संजय भोसले यांना दिलेले होते. त्याप्रमाणे संजय भोसले यांनी लक्ष्मीपूरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला होता. त्याप्रमाणे दोघांना अटक झाली होती व संजय भोसले यांनी घरफाळ्याची बनावट रक्कम काढून अनिरुध्द शेटेवर टाकली होती.या भितीने अनिरुध्द शेटे याचा या प्रकरणात मृत्यू झाला आहे व या घरफाळा चौकशी अहवालामध्ये अनिरुध्द शेटे हा निर्दोष झालेला आहे.त्यानंतर मी वेळोवेळी माहिती अधिकारात घरफाळ्यात झालेल्या आर्थिक नुकसानीसंदर्भातील कागदपत्रे मिळवून आयुक्तांकडे असंख्य तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त व प्रशासक बलकवडे यांनी घरफाळा विभागाचे सहाय्यक आयुक्त व कर निर्धारक व संग्राहक विनायक औंधकर यांना फेरचौकशीचे आदेश दिले होते. श्री. विनायक आँधकर यांनी ८ महिने कायदेशीर चौकशी पूर्ण केली. व या चौकशीमध्ये खुद संजय भोसले हे दोषी असल्याचे उघड झाले आहे. तसा अहवाल मा. प्रशासकांच्या मंजूरीने लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन येथे सहाय्यक आयुक्त विनायक आँधकर यांनी दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी पोलिस निरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलिस यांना पत्र दिले की हा अहवाल आहे आणि एकूण घरफाळ्याची फसवणूकीची रक्कम १,५५,४४,०२५ म्हणजेच तब्बल दीड कोटीच्या वर असून संजय भोसले यांनी संगणकातील माहितीत फेरफार केले आहेत. त्यामुळे संजय भोसले हेच या घरफाळ्याच्या फसवणुकीच्या रक्कमेस जबाबदार आहेत. त्यानंतर आजतागायत संजय भोसले यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. संजय भोसले हे मालमत्ता कर घोटाळ्यातील मुख्य दोषी आहेत. कोल्हापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त (कर निर्धारक व संग्राहक) म्हणून ज्या कालावधीसाठी ते काम करत होते तो कालावधी हेतू पुरस्स बाजूला ठेवून त्यांनी प्राथमिक चौकशी केली आहे. त्यांनी खोटा प्राथमिक घरफाळा चौकशी अहवाल दाखल केला आहे.

या घरफाळा घोटाळा प्रकरणी मा. आयुक्त प्रशासक, जिल्हा पोलीस प्रमुख नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपाआयुक्त, सहाय्यक आयुक्त संदीप घारगे, सहाय्यक आयुक्त व तत्कालीन कर निर्धारक व संग्रालय विनायक औंधकर तसेच मुख्य लेखापरिक्षक मिलींद कुलकर्णी, प्रभारी मुख्य लेखापरिक्षक वर्षा परीट, संजय भोसले तत्कालीन कर निर्धारक व संग्रालय या सर्वांना उच्च न्यायालय फौजदारी याचिकेमध्ये प्रतिवादी केलेले आहे.त्यानंतर अंतिम चौकशी अहवालात संजय भोसले याचेच नाव या घरफाळा घोटाळ्यात दोषी म्हणून उघड झाले आहे. कोल्हापूर महापालिकेची सुमारे दीड कोटी रुपये इतकी मोठी फसवणूक संजय भोसले आणि इतरांनी संगनमताने केली आहे. यासंदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक यांना समक्ष भेटून त्यांना लेखी तक्रार दिली असता त्यांनी संजय भोसले यांना एफ.आय.आर. मध्ये आरोपी केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळेच न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात हे प्रकरणे दाखल केले असल्याचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी यावेळी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.या प्रकरणात संजय भोसले यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी शेटे यांनी मागणी केली आहे. कारण याबाबत वेळोवेळी
कोल्हापूर महापालिका प्रशासन तसेच लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याकडून कोणतेच पाऊल उचलले जात नसल्यामुळे अखेर उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा पर्याय माझ्याकडे
राहिला आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात ऍड. निरंजन भावके यांनी फौजदारी याचिका दाखल केली आहे. तसेच संजय भोसले यांनी कोल्हापूर शहरातील स्टार बझार, बिग बझार, डोमिनो पिझ्झा व स्टेट बैंक ऑफ इंडिया या चार मिळकत धारकांना घरफाळ्यामध्ये तेवीस कोटी रुपयाची सूट देवून कोल्हापूर महापालिकेचे घरफाळ्याचे आर्थिक नुकसान केल्याचे सिद्ध झाले आहे तरी प्रशासक त्याच्यावर गेली दीड वर्ष निलंबन व फौजदारी कारवाई करत नाहीत. याबाबतही ही मी मुंबई उच्च न्यायालय येथे संजय भोसले व प्रशासक व त्यांचे अधिकारी यांच्यावर लवकरच फौजदारी याचिका दाखल करत आहे.असे शेटे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments