Tuesday, July 23, 2024
Home ताज्या अतिग्रे येथील लंम्‍पीस्कीन या आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांच्या गोठ्यावर गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील...

अतिग्रे येथील लंम्‍पीस्कीन या आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांच्या गोठ्यावर गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांची भेट

अतिग्रे येथील लंम्‍पीस्कीन या आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांच्या गोठ्यावर गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांची भेट

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे, चौगलेवाडी (ता. हातकणंगले) येथील दूध उत्पादकांच्या जनावरांना लागण झालेल्या’लंम्‍पीस्कीन त्‍वचारोग’ बाधित जनावराची पाहणी कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक डॉ.सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व वैद्यकीय अधिकारी यांनी केली.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि लंम्‍पीस्कीन हा रोग जनावरांच्या त्वचे संबंधीत आजार असून हा संसर्गजन्य रोग आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. तसेच अति प्रमाणात लागण झालेले जनावर दगावण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादकांनी आजारी जनावरे व इतर जनावरे एकाच  गोट्यातून बाजूला करावीत. दूध उत्पादकानी आजारग्रस्त जनावरांची सेवा करताना हात मोजे वापरावेत अशा सूचना दिल्या तसेच संघाच्या व सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने औषध उपचार करणे फार गरजेचे आहे.हा आजार रोखण्यासाठी गोकुळचे वैद्यकीय पथक तयार करून उपयायोजना त्या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन उपचार केले जाणार आहेत.तसेच संघाशी सलग्न सर्व दूध संस्थाना या त्वचारोगाबद्दल माहिती व त्यावर उपाय असलेले परिपत्रक संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत संस्थाना पाठवले जाणार आहे.
अतिग्रे येथील चौगलेवाडी येथील अजित विलास चौगुले, दादा चौगुले, आदित्य काकासो चौगुले, दिनकर रामू पाटील, उदय श्रीधर पाटील, सखाराम गोपाळ मुसळे, काकासो कल्लाप्पा चौगुले, चंद्रशेखर माणिक पाटील या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन जनावरांची पाहणी केली.
यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक डॉ.सुजित मिणचेकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, सहा.व्यवस्थापक डॉ.पी.व्ही.दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, दूध संकलन अधिकारी आर.एन. पाटील, विस्तार पर्यवेक्षक विक्रम पाटील यांच्यासह गावातील दूध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments