छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्त्व केले तर काय बिघडत नाही-मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी लढणारे सर्व बांधव आणि मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांना विनंती आहे की, आरक्षणासाठी शेवटी आपल्याला कोणाला तरी पुढं करावच लागणार आहे आणि हे काम निःस्वार्थीपणे छत्रपती संभाजीराजे करत असतील तर त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. उगाच एकमेका वर टिका करून आपण आपसातल्या भांडणाचा चुकीचा संदेश ईतर लोकांमध्ये पोहचवत आहोत याच भान असू द्या असे मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी बोलून दाखविले आहे.
छत्रपती संभाजीराजे एवढे प्रामाणिक आणि समाजा विषयी तळमळीचे प्रयत्न करणारे नेतृत्व आहे. दुसरे कोणी असे नेतृत्व करत असेल तर त्यांच्या मागेही आपण समाज बांधव म्हणुन उभे राहीले पाहीजे. गेले दोन अडीच वर्ष छत्रपती संभाजीराजे हे व्यापक स्वरूपात मराठा समाज्यांच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.असेही तळेकर म्हणत आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या नावांनी पोळ्या भाजून काहींनी पुढारकी गाजवली
मंग काहींनी काही पक्षांची गल्लीतली पद घेतली. सत्तेतील पुढाऱ्यांच्या जवळ गेले. मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन घेऊन मत्रालयात जायचे खरे पण त्या खालून अनेक स्वतःची कामे यांनी करून घेतले. आणि आता हिच मंडळी छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधात बोलत आहेत.
सर्व मराठा बांधवांना विनंती आहे आपण आपआपसात ऐकमेकावर टिका टिप्पनी करू नका ! जो कोणी मराठा जातीचा लढा लढत असेल त्याला सर्वांगाने मदत केली पाहीजे.दक्षिण मुंबई मराठा मोर्चा समन्वयक म्हणुन माझी आपणा सर्वांना विनंती आहे मराठा जातिचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र या आणी जो कोणी मराठा जातीचा लढा लढत असेल त्याला सहकार्य करा असे आवाहन तळेकर यांनी म्हंटले आहे.