शिवसेना कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी उद्या १७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ८० % समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकासाचे ध्येय समोर ठेवून शिवसैनिक काम करणार असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्व, समाजकार्य या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेच्या विविध पदांवर काम करण्यास इच्छुक असलेल्या कोल्हापूर जिल्हाकार्यकारणी उद्या दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर दिली आहे.मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेवून आम्ही काम करत असून, जिल्हा पातळीवर शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तर शहर पातळीवर शहरप्रमुख, महिला आघाडी शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.