कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तिरंगा ध्वजाचे आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते गैबी चौकात वाटप
कागल/प्रतिनिधी : कागल शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमे अंतर्गत आमदार हसन साहेब मुश्रीफ यांच्या हस्ते नागरिकांना मोफत दोन हजार ध्वजांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, सुनील माने, सौरभ पाटील, शशिकांत नाईक, आनंदा परीट, भरत निंबाळकर आदी प्रमुख उपस्थित होते.