Sunday, July 14, 2024
Home ताज्या डॉ. आंबोळे यांनी ईश्वरसेवा मानून रुग्णसेवा केली - आमदार हसन मुश्रीफ यांचे...

डॉ. आंबोळे यांनी ईश्वरसेवा मानून रुग्णसेवा केली – आमदार हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार

डॉ. आंबोळे यांनी ईश्वरसेवा मानून रुग्णसेवा केली – आमदार हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार

सेवानिवृत्तीनिमित्त गडहिंग्लजमध्ये केला सत्कार

गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिलीप आंबोळे यांनी ईश्वरसेवा मानूनच रुग्णसेवा केली, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. रुग्ण आणि आपल्यात त्यांनी कधी दुरावाच ठेवला नाही, असेही ते म्हणाले.गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते डॉ. आंबोळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार झाला.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ज्यावेळी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी डॉ. आंबोळे यांच्या कार्याची नोंद घ्यावीच लागेल.
सत्काराला उत्तर देताना दिलीप आंबोळे म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी उपजिल्हा रुग्णालयाला पुरविलेल्या सेवा -सुविधा व यंत्रसामग्रीमुळेच रुग्णांची जास्तीत जास्त सेवा करता आली. जशी रुग्णांची अखंड सेवा केली तसेच रुग्ण आणि जनतेकडूनही भरभरून प्रेम मिळाले, अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, माजी नगराध्यक्ष किरणअण्णा कदम, उदयराव जोशी, वसंतराव यमगेकर, हरून सय्यद, गुंडेराव पाटील, रश्मीराज देसाई, महेश सलवादे, राहुल शिरकोळे आदी प्रमुख उपस्थित होते.

“देवदूतासारखे काम…….”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोनाकाळात आंबोळे यांनी केलेली रुग्णसेवा तर महनीय आहे. देवदूताप्रमाणे कोरोनाग्रस्तांची केलेली सेवा आणि हजारोजणांना दिलेले जीवदान हे विसरण्यासारखे नाही असे ते पुढे म्हणाले.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिलीप आंबोळे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त गडहिंग्लजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात डॉ. आंबोळे यांचा सत्कार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी उदयराव जोशी, वसंतराव यमगेकर, किरणअण्णा कदम, सतीश पाटील व इतर प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments