स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.१३ ते १५ऑगस्ट २०२२ या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संबंधीत अधिका-यांची बैठक आयुक्त कार्यालय घेतली.उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सर्वांना दिली. दि.२० जुलै ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका स्तरावर हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सर्वांना प्रशिक्षण, नागरीकांमध्ये जनजागृती इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असलेचे सांगितले. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ७५ हजार राष्ट्रध्वज लावण्याचे नियेाजन आहे. यासाठी शाळा, महाविद्याल यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासोबत बैठक घेऊन हर घर तिरंगा उपक्रमाबाबत माहिती दयावी. शाळा निहाय कॉलेज, एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तिरंगा वॉलेंटियर्स म्हणून नियुक्त करुन जास्तीजास्त प्रसिध्दीचे नियेाजन केले जाणार आहे. तसेच शाळा कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी यांच्या माध्यमातून घरोघरी हा उपक्रम पोहचविला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने या उपक्रमाअंतर्गत मंगळवार, दि.९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सामुहीक राष्ट्रगीत गाण्यात येणार आहे. बचत गटांच्या बैठका तसेच विभागीय कार्यालय स्तरावर सभेच्या माध्यमातून हर घर तिरंगा मोहिमेबाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बचत गटांनी तिरंगा राखी बनविण्यास सुरवात केलेली आहे. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालय व शहर उपजिविका केंद्र येथे स्टॉल लावण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या घरी भेटी देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. ११ ऑगस्ट २०२२ रोजी महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यासंदर्भात नियोजन सुरु आहे. विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपूरीच्यावतीने स्वातंत्र सैनिकांचे प्रतिभानगर येथे कार्यप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या ओपन स्पेस पांजपोळ येथे कामगांरासाठी शौचालये व नागरीकांसाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम करण्यात येणार आहे. याचबरोबर फेसबुक, ट्विटर व व्हॉटस ॲप या सोशल मिडीयाच्या माध्यमातून गुगल स्प्रेड शीट प्रसारीत करुन हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी नागरीकांचे प्रतिसाद नोंदविण्यात येत आहेत. आरोग्य प्रशासनाच्यावतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील नागरीकांनी, स्वयंसेवी संस्थांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करणेसाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, के.एम.सी कॉलेजचे प्राचार्य अरुण पौडमल, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोगय निरिक्षक डॉ.विजय पाटील, एनयूएलएमचे व्यवस्थापक निवास कोळी, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील व नोडल अधिकारी मनीष पवार उपस्थित होते.