डेक्कन स्पोर्ट्स क्लब आयोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला होणार,नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै पर्यंत
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर जिल्हा हा वैविध्यतने संपन्न असा जिल्हा आहे.शिवाय कोल्हापूर ही कलानगरी शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते या नगरीला कलेचा वारसा लाभलेला आहे करवीर निवासिनी आई अंबाबाई च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीतील पन्हाळा याठिकाणीं निसर्गरम्य वातावरणात धावणे म्हणजे शरीरासाठी शरीराला ऊर्जा देणारे असेच आहे. याच उद्देशाने कोल्हापूरकरांसाठी व देशविदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व असोसिएशन इन शांतिनिकेतन यांच्या वतीने येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी ही ३१ जुलै पर्यंत करावयाची आहे.आता पर्यंत दिल्ली, लातूर,सोलापूर,हुबळी,धारवाड,बेळगाव, नाशिक,सांगली,विटा अशा विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी नाव नोंदणी केलेली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागठिळक उदय पाटील,आयर्नमॅन वैभव बेळगावकर,असोसिएशन इन शांतिनिकेतनचे उपप्राचार्य श्रीपाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पन्हाळा हा ऐतिहासिक गड (किल्ला) जपा असा संदेश या मॅरेथॉन मधून दिला जाणार आहे.तर “रन फॉर हेरिटेज कंझर्वेशन”हे स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. यावेळी डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गड किल्याचे जतन व संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर असे आहे
स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची असून यातील २१ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी ६ वाजता तबक उद्यान पन्हाळा येथून सूरु होणार आहे ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला,पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान येथे समाप्त अशी होणार आहे.
तर ११ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला, पावनगड,बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान समाप्त होणार आहे.आणि ५ तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी असणार आहे.
मॅरेथॉनचे वयोगट असे आहेत
या हाफ मॅरेथॉन मधील ५ किलोमीटरची मॅरेथॉन ही १३ वर्षांपासून पुढील वय व ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१.१किलोमीटरची मॅरेथॉन ही १८ वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.
सहभागी सर्व स्पर्धकांना मिळणार किट
जवळजवळ दोन हजार स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी )ई – सर्टिफिकेट नाश्ता आदी दिले जाणार आहे.
स्पर्धेची नाव नोंदणी येथे करा
स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही आता ३१ जुलै पर्यंत करावयाची आहे.ही नोंदणी www.dscorg.in या वेबसाईटवर करावयाची असून अधिक महितीसाठी संपर्क हा समीर नागटिळे ९९२३६१८०५४,आणि वैभव बेळगावकर – ८२०८१७२४०९ या मोबाईल क्रमांकाशी करायचा आहे.
या स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत असणार आहेत.डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले,अँड.अनुजा मेहेंदळे आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.