गोकुळ’मार्फत डॉ.चेतन नरके यांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची इंडियन डेअरी असोसिएशन(आय.डी.ए) नवी दिल्लीच्या संचालक पदी महाराष्ट्रातून बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.
यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले कि संचालक चेतन नरके यांची देशातील डेअरी उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या आय.डी.ए च्या संचालक पदी निवड होणे हि संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारास उत्तर देताना संचालक डॉ.चेतन नरके म्हणाले कि या पदाचा वापर राज्यातील व जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी तसेच गोकुळ व आय.डी.ए च्या
माध्यमातून दुग्धव्यवसायाच्या विकासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे मनोगत व्यक्त केले. सत्कार केले बद्दल संचालक मंडळाचे आभार मानले.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,अभिजित तायशेटे,अजित नरके,नविद मुश्रीफ,शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले, रणजीतसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील, प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,शैमिका महाडिक, तज्ञ संचालक युवराज पाटील, विजयसिंह मोरे, शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,एन.डी.डी.बी.चे अधिकारी अनिल हत्तेकर, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.