डिजिटल मिडिया संघटनेचे राज्य अधिवेशन महाबळेश्वर मध्ये संस्थापक-अध्यक्ष राजा माने यांची कोल्हापुरात घोषणा
कोल्हापूर/प्रतिनिधी : डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचे पहिलं अधिवेशन येत्या आॅगस्ट महिन्यात महाबळेश्वर मध्ये होणार असलेची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक-पत्रकार राजा माने यांनी कोल्हापुरात केली. मंगळवारी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य, सभासद यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटना ही राज्यभर काम करते. गेली अनेक वर्ष माध्यमक्षेत्रामध्ये काम करणाºया पत्रकारांनी वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनेल सुरु केली आहेत. या डिजिटल मिडियाला मोठ्या प्रमाणात जगभरातुन प्रतिसाद मिळत आहे. या मिडियाला केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळावी, तसेच डिजिटल मिडियाच्या संपादक-पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. मंगळवारी २६ जुलै रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील डिजिटल मिडियातील मालक, संपादक, पत्रकारांची बैठक घेतली. कोल्हापुरातील माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना राजा माने यांनी संघटनेचं महाराष्ट्रात पहिलं अधिवेशन येत्या आॅगस्ट महिन्यात महाबळेश्वर मध्ये होणार असलेची घोषणा केली. तसेच डिजिटल मिडियावर बोलताना ते म्हणाले,. बैठकीमध्ये उपस्थित संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले यांचेसह संपादक-पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली. राजा माने यांना आगरकर पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचा कोल्हापूर डिजिटल मिडियातील संपादक-पत्रकारांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ‘कोजिमाशी’ च्या दादासाहेब लाड यांच्या पॅनेलने घवघवित यश मिळवून सत्ता अबाधित ठेवली, त्याबद्दल दादासाहेब लाड यांचा राजा माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लाड यांनी भविष्यामध्ये डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटनेला लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. दरम्यान बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर, शहर उपाध्यक्ष राजेंद्र मकोटे, सचिव मदन अहिरे, सहसचिव अजय शिंगे, कार्यकारणी सदस्य शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, अक्षय थोरवत, सतिश वणिरे, एम. ए. पठाण, बाबासाहेब खाडे, अन्सार मुल्ला, संदीप घाटगे, ग्रामीणमध्ये राधानगरी तालुका अध्यक्ष सागर धुंदरे, पन्हाळा तालुका अध्यक्ष बाबासाहेब जाधव, करवीर तालुका अध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला आदींचा समावेश आहे. प्रास्ताविक लाईव्ह मराठीचे व्यवस्थापकीय संचालक-संपादक प्रमोद मोरे तर आभार कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर यांनी मानले. सूत्रसंचालन स्पीड न्यूज २४ चॅनेलचे एकनाथ पाटील यांनी केलं.