Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्या - आमदार जयश्री जाधव

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्या – आमदार जयश्री जाधव

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्या – आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर/प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा उचित सन्मान व्हावा, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आण्णांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी मी शासन दरबारी प्रयत्नशील आहे. कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाच पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु असून, यासाठी प्रसंगी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
कलायोगी जी. कांबळे यांच्या खासबाग मैदानाजवळील स्मृती शिल्पास आज स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आमदार जाधव यांनी अभिवादन केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, मंगळवार पेठेतील गरीब कुटुंबात कलायोगी जी. कांबळेचा जन्म झाला. जेमतेम तिसरी पर्यंत शिक्षण घेतलेल्या कलायोगीनी चित्रकलेची आवड मात्र बालपणापासून जोपासली. चित्रकलेच्या आवडीला त्यांनी बारीक निरीक्षण, स्वविचार आणि निर्माणशील मनाने प्रचंड मेहनत घेऊन तेही चित्रकलेचे कोणतेही प्राथमिक शिक्षण नसताना व कोणत्याही मान्यवर चित्रकाराचे मार्गदर्शन नसताना आपल्या अंगभूत गुणांवर व ईश्वरी सामर्थ्यावर विश्वास ठेऊन त्यांनी कलाक्षेत्रात स्वतः चे स्थान निर्माण केले. त्यातूनच पोस्टर पेटिंगचा बादशहा म्हणून त्यांनी भारतभर सन्मान मिळवला हे एक आश्चर्य म्हणावे लागेल.
मनाची श्रीमंती असलेला उमदा आणि प्रतिभावंत कलाकार म्हणून कलायोगीचा उल्लेख करावा लागेल. छत्रपती शिवरायांच्या त्यांनी रेखाटलेल्या तैलचित्राने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. त्यांनी चित्रपटसृष्टीतील मोलाचे योगदान दिले. कला क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरण राहणारे आहे. पण अद्याप पर्यंत या महान चित्रकाराला महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले नाही, ही शोकांतीका आहे. मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती, पण योग्य ती दखल घेतली गेली नाही. यामुळे कलायोगी जी कांबळे यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, विनायक फाळके, विनायक साळुंखे, अभिषेक देवणे, महानगरपालिका उपशहर अभियंता सुरेश पाटील, अशोक कांबळे, राजू कांबळे, वसंत कांबळे, अजित जाधव, विलास गौड, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments