आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून भाजपाच्यावतीने
उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज दिनांक २२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते मा.देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजपा कोल्हापूरच्यावतीने शहरात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम राबवून सेवाकार्याच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी “आरोग्यसेवा” उपक्रम राबवण्यात आले.
वकृत्व, कर्तव्य, नेतृत्व, अभ्यास, दुरदृष्टी, प्रखर राष्ट्रभक्ती अशा विविध गुणांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याना आपलेसे वाटणारे देवेंद्रजी फडणवीस या बहुआयामी व्यक्तिमत्वस सर्व ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील उत्तमोत्तम राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शहरातील मोरया, के.पी.सी, कलाप्रसाद, निगडे हॉस्पिटल, गडकर आय हॉस्पिटल अशा नामवंत हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने आज दिवसभरात ब्लड प्रेशर, शुगर, कार्डिओ, पोट विकार, आतड्यांचे विकार, जरनल चेकअप, बी.पी, शुगर, लेजर उपचार, बालरोग तपासणी, यूरोलॉजि, अर्थोपेडीक, लहान मुलांची आरोग्य तपासणी (१२ वर्षाखालील), श्रवण दोष चाचणी, डोळे तपासणी अशा विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली
चौकट :-
आजच्या शिबिरांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मा.देवेंद्र फडणवीस यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्य ५२ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.आज शहरात विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये जवळपास ४३० इतक्या नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असून पुढील उपचार घेणाऱ्या रुग्णांवर महात्मा फुले योजनेसारख्या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून हे उपचार करण्यात येणार आहेत.
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने चेतना विकास मंदिर बौद्धिक अक्षम मुलांची शाळा शेंडा पार्क येथ मुलांना फळे वितरण करणात आली. याप्रसंगी विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, विराज चिखलीकर, विवेक वोरा, पारस पलीचा, विजय दरवान, गौरव सातपुते, गोविंद पांडीया, विश्वजित पोवार, योगेश सुतार, सुनील पाटील, ओंकार गोसावी, प्रदीप घाटगे यांच्यासह युवा पदाधिकारी उपस्थित होते.या शिबिरांना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र.का.सदस्य महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, अशोक देसाई, विजय जाधव, विठ्ठल पाटील या प्रमुख मान्यवरांनी भेट दिली.
सर्व ठिकाणची आरोग्य शिबीरे यशस्वी होण्यासाठी शाहूपुरी मंडला मध्ये आशिष कपडेकर, दिलीप मेत्राणी, समयश्री अय्यर, राजेंद्र माळगे, अनुप देसाई ई.
लक्ष्मीपुरी मंडलामध्ये विवेक कुलकर्णी, सचिन तोडकर, मारुती भागोजी, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, महेश यादव, प्रवीण शिंदे, अप्पा लाड, जयश्री वायचळ, मंगल निपाणीकर, धनश्री तोडकर, सुजाता पाटील ई.
राजारामपुरी मंडलामध्ये विजय जाधव, अभिजित शिंदे, दिलीप बोंद्रे, सागर केंगार, कालिदास बोरकर, महादेव बिरांजे, देवरथ लोंढे, दत्ता लोखंडे, सागर आथणे, ओमकार घाटगे, मानसिंग पाटील ई.
मंगळवार पेठ मंडलामध्ये सुधीर देसाई, प्रीतम यादव, सौरभ मालंडकर, किशोर कारेकर, अनिकेत सोलापुरे, डॉ. विनायक शिंदे, सचिन आवळे, प्रमोदिनी हर्डीकर, राजेंद्र वडगावकर, अरविंद वडगावकर ई.
शिवाजी पेठ मंडला मध्ये संजय सावंत, सचिन सुतार, राजू मोरे, अजित ठाणेकर, संगीता सावंत, लता बर्गे, प्रकाश घाटगे, सुहास पाटील, विजय आगरवाल आदी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील वैद्यकीय कक्षाच्यावतीने राहूल चौगले, प्रथमेश पाटील, आकाश दळवी, हिंदुराव पाटील, विजय शिंदे, विश्नाथ रांजणे, नितीन कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.या आरोग्य शिबिरांसाठी पी.आर.ओ म्हणून संजय पाटील, नामदेव कांबळे, वाजीद आगार यांनी काम पाहिले.भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सेवा कार्याच्या माध्यमातून मा.देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला.