कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड
संवर्धनासाठी देण्याचा उपक्रम कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांचा सहभाग
कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप वाटप कार्यक्रम आज कोरगावकर पेट्रोल पंप येथे पार पडला. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन काळाची गरज बनली असून यासाठी प्रत्येक वर्षी कोल्हापुरातील कोरगावकर ट्रस्ट यांच्यावतीने झाडांची रोपे देऊन ती जगवण्याची हमी घेतली जाते. यावर्षीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध संस्था सामाजिक संघटना एनजीओ नागरिक यांना प्रत्येकी २० झाडे लावण्याची आणि ती जगवण्याची जबाबदारी देण्यात आली असून या झाडांचे जतन आणि संवर्धन योग्य प्रकारे होईल. त्याची वर्षभराने नोंद घेऊन त्यांची नावे राष्ट्रीय पुरस्काराची देण्यात येणार आहेत. कोरगावकर पण पेट्रोल पंपावर ही झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिक संस्थांनी संपर्क साधून ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन राज कोरगावकर यांनी केले आहे.यावेळी कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, शिरोलीचे सरपंच श्री शशिकांत खवरे,प्रभू हॉस्पिटलचे डॉ.संतोष प्रभू, पोलीस निरीक्षक सागर पाटील, एच.पी. सेल्सचे आदित्य अग्रवाल, राज कोरगावकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.