पाणीटंचाईवर लक्ष वेघण्यासाठी कोल्हापूरमध्ये नवदांपत्याची पाण्याच्या टॅकर वरून वरात
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब खासबागचे कार्यकर्ते विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे आज विवाहबद्ध झाले त्यानिमित्ताने त्यांची आज महाद्वार रोड मिरजकर तीकटी खासबाग परिसरातून अभिनव पद्धतीने हलगी लेझीम गुनक्याच्या तालावर अभिनव पद्धतीने चक्क पाण्याच्या टँकरवरून वरात काढण्यात आली हा कोल्हापुरात चांगलाच चर्चेचा विषय होता.
पाण्याच्या टँकरवर वधू वर बसले होते त्यांच्या मागे मोठा फलक होता महापालिकेच्या चावीला नियमित पाणी येत नाही म्हणून बायकोला त्रास नको त्याकरिता हुंडा म्हणून आम्ही पाण्याचा टँकर घेतलाय , असा लक्षवेधी मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता,त्या पाण्याच्या टँकरवर आणखीन एक लक्षवेधी वाक्य दिले होते /जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही आणि त्यांच्यापुढे महिला व मुले डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन हलगीच्या तालावर नाचत होते.इतकेच नाहीतर
ही लक्षवेधी लग्नाची वरात रात्री उशिरा नवरदेवांच्या गल्लीत पोचल्यावर नवदांपत्यांनी टँकरची पाईप हातात घेऊन त्यातून घरात पाणीपुरवठा केला. या मिरवणुकीचे संयोजन सचिन साबळे, अमित पोवार,रमेश मोरे, अभिजीत पोवार,संजय पिसाळे,संदीप पोवार,स. ना. जोशी, अशोक पोवार आदि कार्यकर्त्यांनी केले.