Tuesday, October 15, 2024
Home ताज्या केंद्र सरकारकडून साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ - खासदार धनंजय महाडिक यांच्या...

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ – खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ – खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांश साखर कारखानदारांनी साखर निर्यातीचा निर्णय घेऊन, कच्ची साखर विविध बंदरांवर पोचवली. मात्र केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे, हजारो क्विंटल साखर बंदरांवर पडून आहे. शिवाय देशभरातील साखर कारखान्यांकडेंही मोठया प्रमाणात साखर पडून आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याकडेे केली होती. त्याची दखल घेऊन, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेले निर्बंध २० जुलैपर्यंत हटवण्याचा निर्णय घेतलाय. पुढील १५ दिवसात देशभरातील कच्ची साखर निर्यात करायला कारखान्यांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे देशातील सर्वच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यसभेमध्ये खासदार झाल्याबरोबर, धनंजय महाडिक यांनी लगेचच कामाला सुरूवात केली असून, पहिलीच मागणी केंद्र सरकारकडून मान्य करून घेतली. त्यामुळे खासदार महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातल्याने, देशातील सर्वच साखर कारखान्यांकडे साखरेचा प्रचंड साठा शिल्लक आहे. नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात, देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. त्यातून अनेक साखर कारखान्यांकडे कच्ची आणि पक्की साखर पडून आहे. देशातील साखर कारखान्याकडे कच्च्या साखरेचा पाच लाख टनाचा साठा शिल्लक आहे. तर विविध बंदरांवर सुमारे २ लाख टन कच्ची साखर पडून आहे. निर्यातीसाठी बंदरावर पोचवलेली साखर, केंद्र शासनाच्या निर्बंधांमुळे पडून राहीली. परिणामी या साखरेचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्याने, दर ढासळून, साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन, साखरेच्या निर्यातीवरील बंदी १५ दिवसांसाठी उठवण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतलाय. केंद्र शासनाचा हा निर्णय साखर क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून, त्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे यांनी, खासदार महाडिक यांना धन्यवाद दिले. केंद्र शासनाने निर्यात बंदी १५ दिवसांसाठी हटवल्याने साखर कारखानदारीसह संबंधीत सर्व घटकांना त्याचा मोठा फायदा होईल, असे मत साखर उद्योग अभ्यासक पी.जी. मेढे यांनी व्यक्त केले. खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार झाल्यानंतर लगेचच विविध प्रश्‍नांचा अभ्यास करून, त्याच्या सोडवणुकीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केलाय. साखर निर्यात बंदीमुळे देशभरातील साखर कारखान्यांसमोर उभा राहीलेला महत्वाचा प्रश्‍न सोडवण्यात, खासदार धनंजय महाडिक यशस्वी झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रश्‍न सोडवल्याबद्दल साखर कारखानदारीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments