राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सारथी मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर
कोल्हापूर, दि.25(जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सारथी संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सारथी संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम म्हणुन हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) चे व्यवस्थापकीय संचालक अशोक पाटील यांनी केले आहे.