राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आज राजर्षी शाहू पुरस्कार वितरण कार्यक्रम -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका): राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने १४८ वा राजर्षी शाहू जयंती उत्सव २०२२ कार्यक्रम रविवार दि. २६ जून रोजी सायं. ६ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.
राजर्षी शाहू कार्य व विचार वृध्दींगत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांना सन २०२० साठी तर डॉ. जनार्दन वाघमारे यांना सन २०२२ साठी राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.