Tuesday, October 15, 2024
Home ताज्या जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या "शिवालय" कोल्हापूर शहर कार्यालयाचा उद्या दि.१९...

जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या “शिवालय” कोल्हापूर शहर कार्यालयाचा उद्या दि.१९ जून रोजी उद्घाटन सोहळा

जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या “शिवालय” कोल्हापूर शहर कार्यालयाचा उद्या दि.१९ जून रोजी उद्घाटन सोहळा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मूलमंत्राचे बाळकडू दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जनसेवेचे व्रत अखंडित जोपासले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवसेनेच्या शाखा आणि विभागीय कार्यालये असून, या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे काम शिवसैनिक करत आहेत.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने सन २००७ साली लावलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. वटवृक्षात रुपांतर होताना “शिवालय” अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून कोल्हापूरच्या शिवसैनिकांसोबत उभा आहे. एका खोलीतून सुरु झालेला “शिवालय” चा प्रवास आता भव्यदिव्य वास्तूच्या रूपाने बहरत आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांची शिदोरी घेवून समाजकार्याच्या प्रत्येक कामात, चळवळीत हजारो शिवसैनिकांना बळ देणारी, लाखो नागरिकांना न्याय हक्क मिळवून देणारी १२ महिने २४ तास जनसेवेसाठी उपलब्ध असणारी वास्तू म्हणजेच “शिवालय”.. रंजल्या, गांजल्या व गोरगरीब- वंचीतांसाठीचा आधार बनलेले “शिवालय” शहराच्या विकासातही मोठे योगदान देत आहे. हजारो रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया, वैद्यकीय निधीचा लाभ देण्यासाठीची पहिली पायरी “शिवालय” आहे. यासह दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना विनाडोनेशन कॉलेज, शाळामध्ये प्रवेश, युवा वर्गाला रोजगाराचे माध्यम, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये मदतीचा केंद्रबिंदू हे “शिवालय” आहे. महिला सक्षमीकरण, महिला रोजगार निर्मिती, बचत गटांना न्याय देणारे हक्काचे ठिकाण म्हणून माता-भगिनी “शिवालय”कडे पाहतात. रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले, कर्मचारी वर्ग, कलाकार आदी प्रत्येक क्षेत्रातील घटकांचा आधारवड असलेले “शिवालय” वास्तू न राहता अनेकांसाठी पवित्र मंदिर बनले आहे. सामाजिक उपक्रमासह कोल्हापूरच्या प्रत्येक चळवळीत अग्रभागी राहण्यासाठी शिवसैनिकांना बळ दिले ते “शिवालय” ने.. टोल, एल.बी.टी., देशव्यापी प्रश्नास वाचा फोडणारे पहिले ठिकाण म्हणजे “शिवालय”.. कोल्हापूर उत्तर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकविला गेला तो याच “शिवालय” मधून, विधानसभेमध्ये कोल्हापूरचा आवाज खणखणीत ठेवण्यासाठी तयारी करणारे प्रमुख ठिकाण “शिवालय” आहे. अशा या पवित्र वास्तूचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण पूर्ण झाले असून, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांना अभिप्रेत आणि शिवसेनापक्षप्रमुख मुख्यमंत्री ना.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांना अपेक्षित जनसेवेची व्याप्ती वाढविण्यासाठी नव्याने सुसज्ज झालेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व पूजा शिवसेना पक्ष स्थापनेच्या वर्धापन दिनी रविवार दि.१९ जून, २०२२ रोजी सायं.५ ते ९ या वेळेत करण्याचे योजिले आहे. या पवित्र वास्तूचा उद्घाटन सोहळ्या निमित्त आयोजित पूजा कार्य व तीर्थप्रसादास कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी व समस्त शिवसैनिकांनी उपस्थित राहून जनसेवेचे व्रत अखंडितपणे जोपासण्यास पाठबळ द्यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments