Tuesday, July 23, 2024
Home ताज्या मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच - ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांचे...

मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच – ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांचे प्रतिपादन

मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच – ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांचे प्रतिपादन

करंजिवणेत साडेचार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण उत्साहात

करंजिवणे/प्रतिनिधी : मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे. मात्र; मंत्पदाची हवा कधीही डोक्यात शिरू दिली नाही. मी मंत्री असलो तरी गोरगरीब जनतेचा हमाल आहे., असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहीन, असेही ते म्हणाले.
करंजीवने ता. कागल येथे विवीध विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एस. पवार होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे ग्रामीण विकासासाठी निधी देण्याचे काम माझ्याकडे आहे. मी ग्रामविकास मंत्री असल्याने प्राथमिक शाळा दुरूस्तीसाठी, क्रीडा संकुलनासाठी कोट्यावधी रुपयेचा निधि मंजुर करणार असून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी निधिसाठी पाठपुरावा करावा. विरोधकावर टीका टीपणी करण्यापेक्षा व केलेल्या टीकेला उत्तर न देता फक्त विकासकामाचे ध्येय गाठणार आहे. विधवासंबंधातील सर्वच जुनाट कुप्रथा मोडीत काढा. तसेच; प्रत्येक गावात विधवा माता-भगिनींचा सन्मान करा, असेही ते म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत म्हणाले, माणसातला खरा देव म्हणजे ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ होय.
उत्तम टेंबुगडे, शशिकांत खोत यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत युवराज लाड यानी केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य संजय आंग्रे यांनी केले. आभार एम. एस. पोवार यांनी मानले.कार्यक्रमासाठी सरपंच दगडू शेटके अन्नपूर्णा शुगरचे संचालक राजेश भराडे, उप सरपंच सौ. वंदना पोवार, सुधीर मासवेकर, बाबूराव शेटके, बाळासो तुरंबे, ग्रामस्थ, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments