Tuesday, October 15, 2024
Home ताज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये आज व उद्या...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये आज व उद्या २२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये आज व उद्या २२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता पर्व निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकराजाला मानाचा मुजरा म्हणून कृतज्ञता पर्व निमित्त भारती हॉस्पिटलच्या वतीने भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल, आयटी पार्क समोर, हॉकी स्टेडियम जवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे येथे आज शनिवार दिनांक २१ व उद्या रविवार २२ मे २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचे व त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये पोटाचे विकार, हृदयाचे विकार, श्वसनाचे विकार, यकृताचे विकार, स्त्री-रोग, हाडांचे विकार, त्वचा रोग, बालरोग, वात व्याधी, अंतःस्त्रावी ग्रंथीविकार, मुळव्याध, भगंदर, वंध्यत्व मुतखडा, लघवीचे विकार, मधुमेह या विकारांवर तज्ञ व अनुभवी डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी, आहार विषयक सल्ला व मार्गदर्शन सवलतीच्या दरामध्ये औषधोपचार, सवलतीच्या दरामध्ये रक्तामधील साखर तपासणी (Random blood sugar ). आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून व कार्यकारी संचालक डॉ.अस्मिताताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात नोंद केलेल्या रुग्णांसाठी भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल, आय.टी. पार्क समोर,मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे सवलतीच्या दरामध्ये पंचकर्म उपचार देण्यात येणार आहेत, असे भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अभिजित शिंदे यांनी कळवलेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments