माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उभारलेल्या कोरोना सेंटरचा गैरवापर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीकडून निषेध
कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये कोरोना महामारी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्तींनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना सेंटर उभारून अनेकांना जीवदान दिले.कोल्हापूर शहरात हॉकी स्टेडियम जवळ भारतीय जनता पक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अत्याधुनिक सामुग्री वापरून सुमारे शंभर खाटांचे सेंटर उभारून रुग्णांवर उपचार केले होते. आज कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हे जे उपचार केंद्र होते ते सेंटर कुलपे लावून दरवाजे बंद करून सर्व साहित्य या सेंटरमध्ये ठेवले होते. त्यावर कोणतीच रखवालदारी नव्हती त्यामुळे काही भुरट्या चोरांनी ही जुजुबी कुलपे तोडून आतील किमती वैद्यकीय साहित्य चोरून नेले व काही फिरस्त्या लोकांनी त्या ठिकाणी नशा करण्यासाठी गैरप्रकार करण्यासाठी या सेंटरचा वापर केला ही बाब अतिशय निंदनीय आहे.याचा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे निषेध केला आहे.ज्यावेळी लोकांना पैसे देऊन सुद्धा उपचार मिळत नव्हते अशावेळी या संघटना पक्ष दानशूर व्यक्तींनी स्वतःच्या खिशातील पैसे घालून शासन यंत्रणेला मदत करून रुग्णाला देवासारखी मदत केली ही अतिशय चांगली घटना आहे पण महापालिका प्रशासनाला याचे काहीच देणे-घेणे दिसत नाही. भविष्यामध्ये महापालिका प्रशासनाला या घटकांनी मदत का करावी असा प्रश्न निर्माण होतो आहे.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकातून अशी मागणी केली आहे की ज्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर या सेंटरची देखभालीची संरक्षणाची जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या वेतनातून हा चोरीचा सर्व खर्च वसूल करावा जेणेकरून इथून पुढे कोणतेही अधिकारी कर्मचारी स्वतःच्या नोकरीच्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत.
बरोबर प्रशासन पोलीस यंत्रणेसोबत या कोल्हापुरातील नागरिकांनीही अशा सार्वजनिक लोकसहभागातून उभारलेल्या वास्तु व सुविधांकडे लक्ष देऊन त्याबाबत काही चुकीचं दिसत असेल तर पोलीस यंत्रणेशी संपर्क करून अशा सुविधांचा रक्षण करणे आपले कर्तव्य मानून सहकार्य करणे गरजेचे आहे.असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे म्हंटले आहे. अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, लहुजी शिंदे, कादर मलबारी, विनोद डूणूंग,चंद्रकांत पाटील, महेश जाधव, प्रमोद पुगावकर, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर आदींचा समावेश पत्रकात आहे.