१९ ते २२ मे रोजी शाहू मिलमध्ये आंबा महोत्सव -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती
कोल्हापूर, दि.12(जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिल, कोल्हापूर येथे दि. १९ ते २२ मे २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरातील नागरिकांना नैसर्गिकरित्या पिकवलेले अस्सल हापूस, केशर, पायरी व इतर प्रकारचे आंबे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले.