Friday, July 19, 2024
Home ताज्या कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर - पालकमंत्री ना....

कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री ना. सतेज पाटील

कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री ना. सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पहिलेच उभारण्यात येणाऱ्या इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री.पाटील म्हणाले, राज्यातील महानगरपालिकांना मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर मनपाकरिता १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.हा निधी उपलब्ध होण्यासाठी नगरविकास विभागाकडे माझ्या कार्यालयाकडून पाठपुरावा केला होता. सदर प्रकल्पाअंतर्गतची कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणी होणे गरजेचे असून या माध्यमातून मनपा क्षेत्रात इनडोअर स्टेडियमच्या कामासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या स्टेडियमच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडू आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी, श्री.पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. जिल्ह्याची असलेली क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या तयार होणाऱ्या इनडोअर स्टेडियममुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अधिकची जागा मिळणार आहे. खेळाडूंना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मी कोल्हापूरकरवासीयांकडून मनःपूर्वक आभार मानतो, अशा भावना पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी आमदार जयश्री जाधव संजय मोहिते ( मा. उपमहापौर ) नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments