विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर,दि.10: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व सुरु आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी आज कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी लोकराजाला अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री पवार-फरांदे, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.