केआयटी तर्फे राष्ट्रीय स्तरावरील स्थापत्य ‘बांधकामासाठी मॅनिफॅक्चर सॅन्ड/ क्रश्ड सॅन्डचा वापर’ विषयक एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
दिनांक/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील केआयटीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागामार्फत ‘बांधकामासाठी मॅनिफॅक्चर सॅन्ड/ क्रश्ड सॅन्डचा वापर’; या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब इथे संपन्न झाली. या कार्यशाळेकरीता बेंगलोरमधील एम. एस. रामय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. एम. सी. नटराजा हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाकरीता इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष डॉ. एम. बी. चौगुले, इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोल्हापूर विभागाचे सचिव श्री. पी. व्ही. कुलकर्णी, आर्क्टिटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशन, कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. अजय कोराणे, केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, संचालक डॉ. एम.एम.
मुजुमदार, स्थापत्य विभाग प्रमुख श्री. मोहन चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यशाळेला यशोधन प्रयोगशाळेचे श्री. सुधीर हांगे, म्हाडाचे अधिकारी श्री. संतोष कळकुटकी आणि स्थापत्य आणि बांधकाम विभागाशी संलग्न मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी अश्या एकूण १५० अभियंत्यांनी या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.
आज एकीकडे नैसर्गिक स्तोत्रांची कमतरता भासत असतानाच, नैसर्गिक वाळूचा वापर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बंद केला गेला आहे. बांधकामासाठी आवश्यक अश्या या घटकाला पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांपासून मॅनिफॅक्चर सॅन्ड/ क्रश्ड सॅन्डचा वापर होऊ लागला आहे. डॉ. एम. सी. नटराजा यांनी कार्यशाळेमध्ये क्रश्ड सॅन्डचे गुणधर्म, काँक्रीटमध्ये क्रश्ड सॅन्डचे योगदान, तांत्रिक अडचणी आणि उत्तरे आणि शाश्वत विकासाकरिता क्रश्ड सॅन्डचा बांधकाम क्षेत्रामध्ये वापर या विषयांवर सविस्तर मांडणी केली.
या कार्यशाळेला स्टार टेक रेडीमिक्स काँक्रीट, बीम अँड कॉलम, कॅलिबर काँक्रीट सोल्युशन, डी. आर. कन्स्ट्रक्शन, अमेय माईन अँड मिनरल, ऍक्युरेट काँक्रीट, धरती स्टोन क्रशर, यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळाले. ही कार्यशाळा पार पडण्याकरीता केआयटीचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. साजिद हुदली आणि सचिव श्री. दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले. श्री. संदीप सावंत, श्री. अभिजीत पाटील आणि श्री. समर्थ शिरोळ यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर स्थापत्य विभागाचे प्रमुख श्री. मोहन चव्हाण आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांनी नियोजन केले. श्रीमती. विदुला वास्कर आणि श्रीमती. वसुंधरा लवांगरे यांनी सूत्रसंचालन केले.