Thursday, July 18, 2024
Home ताज्या आणि शहर व जिल्हा,राज्य झाले स्तब्ध

आणि शहर व जिल्हा,राज्य झाले स्तब्ध

आणि शहर व जिल्हा,राज्य झाले स्तब्ध

 

कोल्हापूर/ (श्रध्दा  जोगळेकर ) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून कोल्हापूर मध्ये साजरे केले जात आहे.या कृतज्ञता पर्व मध्ये विविध कार्यक्रमांचे,उपक्रमांचे आयोजन कोल्हापूर च्या जिल्हा प्रशासनाने व कोल्हापूरच्या पालकमंत्री यांनी केले आहे हे कार्यक्रम १८ एप्रिल पासून सुरू झाले असून आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतीदिन निमित्त कोल्हापूर शहर जिल्हा व राज्य आणि भारत देशात सकाळी सर्वजण धावले आणि बरोबर दहाच्या सुमारास १०० सेकंदासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध झाले. सगळीकडे शांतता होती यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मिळालेल्या २८ वर्षाच्या कार्यकाळात अनेक समाज सुधारणेची कामे केली.राधानगरी धरणाच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूर जिल्हा पुरेल इतका पाणीसाठा निर्माण होईल अशा पद्धतीने राधानगरी धरणाची उभारणी केली आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहांची उभारणी केली आहे. रेल्वेची सोय केली अशा या कल्याणकारी लोकराजाला आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापूर शहर जिल्हा महाराष्ट्र राज्य व संपूर्ण देश १०० सेकंदासाठी स्तब्ध राहिला होता. शांतता सर्वत्र होती.या कृतज्ञता पर्वच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.याला कोल्हापूरकर प्रतिसाद देत आहेत.आज ६ मे रोजी कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात सर्वत्र लोक कामानिमित्त घराबाहेर पडले दहाच्या आत सर्वजण धावले आणि दहा नंतर १०० सेकंदासाठी सर्वजण स्तबद्ध झाले.या त्यांच्या स्मृतिदिन निमित्त कोल्हापूर मध्ये आज ६ रोजी
१०० सेकंद कोल्हापूर स्तब्ध लोकराजाला कोल्हापूरकरांनी अनोखी मानवंदना वाहिली.
विविध विभागांचे मंत्री, राज्यमंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी, इतिहास संशोधक, अभ्यासक, शाहू प्रेमी, नागरिक,विविध संस्था, संघटना,उद्योजक या उपक्रमात सहभागी झाले होते.शाहू महाराज की जय..! या जयघोषात भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.जिल्ह्यातून १७ शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आली होती.जिल्ह्यातील अनेक गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी एकत्रित जमून लोकराजाला अभिवादन हे केले गेले. एस.टी., बसेस, वाहतूक थांबून कोल्हापूर स्तब्ध.शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये अभिवादन केले गेले.आज कोल्हापूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी या शाहू महाराज यांना वंदन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले होते. आता हा उपक्रम केवळ कोल्हापूर पुरता मर्यादित राहिलेला नसून तो राज्य व देशपातळीवर पोहोचला आहे आणि शासनानेही शाहू महाराजांच्या कार्याला पुढेही अखंड चालू ठेवण्याचा निर्धार हा केला आहे.सर्व शाळा,विद्यार्थी यांनीही आज या करवीरच्या लोक राजाला सलाम करत वंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments