७ मे ते ९ मे ला लागणार कोल्हापुरी मिरचीचा झणझणीत तडका
कोल्हापूर/( राजेश कदम): ‘राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक ७ मे ते ९ मे पर्यंत लक्ष्मीपुरी येथे कोल्हापुरी मसाले आणि मिर्ची जत्रा याचे आयोजन करण्यात आले आहे.’कोल्हापूरची ‘उद्यमशील लोकांची नगरी’ अशी ओळख निर्माण झाली याचे श्रेय राजर्षी शाहू महाराज यांना जाते. राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांनी करवीर नगरी मध्ये अनेक बाजारपेठा वसवल्या. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी बसवलेली गुळाची बाजारपेठ होय. चप्पल लाईन, शाहूपुरी मधील गुळाची, लक्ष्मीपुरी तील व्यापाऱ्यांची बाजारपेठ यामुळे करवीरनगरी तील उद्योग जगभरात प्रसिद्ध झाला. बऱ्याच वस्तू निर्यात होऊ लागल्या. बरेच उद्योगांनी नावलोकिक मिळवला. त्यातीलच एक उद्योग म्हणजे म्हणजे लक्ष्मीपुरी तील मसाला आणि मिरची उद्योग. झणझणीत लवंगी मिरची, संकेश्वरी ब्याडगी मिरची आणि विविध मसाले यासाठी लक्ष्मीपुरी मध्ये दर रविवारी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडते.
‘राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक व्यवसायाच्या वाढीसाठी दिनांक ७ मे ते ९ मे पर्यंत लक्ष्मीपुरी येथे विविध मसाले आणि मिर्ची जत्रा याचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व शाहू प्रेमींनी आणि ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन चेंबर्स ऑफ कॉमर्स, किराणा भुसार व्यापारी, ग्रेन मर्चंट असोसिएशन यांनी केले आहे.