Tuesday, July 23, 2024
Home ताज्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड

कोल्हापूर/(भाग्यश्री सुगंधी) : लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त २ मे रोजी उषाराजे हायस्कुल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता माननीय उपशिक्षणाधिकारी सौ. पाथरे यांच्या शुभहस्ते झाले .
या विज्ञान प्रदर्शनासाठी केंद्रीस्तरावरील निवड झालेल्या सहविचार मंच मधील उषाराजे हायस्कुल, म. दू. श्रेष्ठी समता हायस्कुल, प्रायव्हेट हायस्कुल, तवनाप्पा पाटणे हायस्कुल, कोल्हापूर हायस्कुल, शिवशक्ती विद्यालय, पद्मराजे हायस्कुल, दादासाहेब मगदूम हायस्कुल, विद्यापीठ हायस्कुल या सर्व शाळांनी सहभाग घेतला होता.
यावेळी परीक्षक म्हणून श्री. मस्के, श्री इंदुलकर आणि श्री. संकपाळ यांनी काम पाहिले आहे . सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून पाहिल्या पाच क्रमांक काढलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक – पृथ्वीराज अतुल राऊत, विश्वजीत भाटे ( उपकरणाचे नाव – antisleep अलार्म.) द्वितीय – पुष्कर आदिनाथ फाकटकर आणि आफान मोमीन ( उपकरणाचे नाव – सेंद्रिय खतनिर्मिती),तृतीय – प्रसन्न महेश पारले आणि आदिराज सुजय चव्हाण ( उपकरणाचे नाव – हायड्रो फोनिक एग्रीकल्चर फार्मिंग),उत्तेजनार्थ – सृष्टी युवराज सावंत आणि सिद्धांत जाधव (उपकरणाचे नाव – फूड कंट्रोल मॅनेजमेंट अँड रेन वॉटर हार्वेस्टिंग),पाचवा – मिष्का देवेंद्र चौगुले ( उपकरणाचे नाव – लेसर बीम फॉर झेब्रा क्रॉसिंग)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments