Monday, July 15, 2024
Home ताज्या प्राचीन इमारतींच्या रेखाटनातून मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

प्राचीन इमारतींच्या रेखाटनातून मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

प्राचीन इमारतींच्या रेखाटनातून मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर/ (राजेश कदम): ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त श्री शाहू छत्रपती मिल येथे आज सोमवारी सुरु झालेल्या रेखाटन प्रदर्शनाला युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी भेट दिली.असंख्य रेषांच्या स्केचेसमधून जिवंत केलेल्या कोल्हापूरच्या प्राचीन इमारती पाहून त्या भारावून गेल्या. हे स्केचेस पाहून जुन्या शाहुकालीन कोल्हापूरच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
आज दिनांक २ मे ते २२मे पर्यंत छत्रपती शाहू मिल येथे कोल्हापुरातील जुन्या ऐतिहासिक वास्तू, इमारती यांच्या स्केचेस चे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोल्हापूरचा प्राचीन, समृद्ध असा वारसा इमारती आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना दरवर्षी आकर्षित करीत असतो. कोल्हापुरातील प्राचीन कलाकृतींच्या वास्तू बांधणीतील बारकावे या रेखाटनाच्या माध्यमातून सर्व शाहू प्रेमींना अनुभवता येणार आहेत. राजर्षी शाहूंचा हा ऐतिहासिक समृध्द वारसा प्रत्येकाने नक्की अनुभवावा आणि या इमारतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. जागतिक पातळीवरील वास्तू विशारद शिरीष बेरी, शरदचंद्र मोघे, मिलिंद रणदिवे, अमरजा निंबाळकर यांच्यासह रेखाटन ग्रुपच्या सदस्यांनी प्रदर्शनाची आकर्षक मांडणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments