Tuesday, July 23, 2024
Home ताज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकराजा कृतज्ञता पर्व - सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकराजा कृतज्ञता पर्व – सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकराजा कृतज्ञता पर्व –
सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजा शाहू महाराजांच्या जयघोषात सुरु झालेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत घेण्यात आलेल्या सायकल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विविध खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. शाररिक तंदुरुस्तीवर त्यांचा विशेष भर होता. याच विचारांनी कृतज्ञता पर्व मध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे २०० सायकलस्वार सहभागी झाले. फेटे बांधून सहभागी झालेल्या कोल्हापूर सायकलिंग क्लबच्या सदस्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
सकाळी ६ वाजता शाहू समाधी स्थळ येथून सुरु झालेली सायकल रॅली दसरा चौक, बिंदू चौक, पार्वती टॉकीज, शाहू मिल, सायबर चौक, केएसबीपी चौक ते कावळा नाका, शाहू जन्मस्थळ या मार्गाने पुन्हा शाहू समाधी स्थळ ठिकाणी समाप्त झाली. यावेळी कोल्हापूर स्पॉस्ट्स क्लबचे चेतन चव्हाण, रग्गेडियन क्लबचे आकाश कोरगावकर, कोल्हापूर सायकलिंग क्लबचे अनिल शिंदे, उत्तम फराकटे, आदित्य बेडेकर, ऋषिकेश केसकर, उज्वल नागेशकर यांच्यासह सायकलप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments