Friday, September 20, 2024
Home ताज्या येत्या तीन महिन्यात जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील - श्री.राजेश...

येत्या तीन महिन्यात जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – श्री.राजेश क्षीरसागर

येत्या तीन महिन्यात जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – श्री.राजेश क्षीरसागर

श्री.क्षीरसागर यांची कलाकारांच्या साखळी उपोषणास भेट, उपोषण मागे घेण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडीओच्या जागेबद्दल गेली ७७ दिवस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने उपोषण सुरु आहे. जयप्रभा स्टुडीओची जागा कोल्हापूरची अस्मिता असून, कोल्हापूरवासीय आणि कलाकारांच्या भावनांचा अनादर होणार नाही. गेल्या काही दिवसात ही जागा शासन ताब्यात घेवून, विकासकाला पर्यायी जागा देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहे. पुढील आठवड्यात नगरविकास मंत्री महोदयांची भेट घेवून याविषयी पुन्हा सकारात्मक चर्चा करणार आहे. येत्या तीन महिन्यात स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. जयप्रभा स्टुडीओ येथे चित्रपट महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणास श्री.क्षीरसागर यांनी भेट दिली. यासह स्टुडीओ परिसराची पाहणी केली. यावेळी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि दादासाहेब फाळके यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या उन्नतीसाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील आहे. जयप्रभा स्टुडीओच्या जागेसाठी २०१२ मध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी होतो. लोकभावनांचा आदर ठेवून खरेदीदार कंपनीस पर्यायी जागा स्विकारून स्टुडीओची जागा शासन ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह तातडीने नगरविकास मंत्री महोदयांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले आहे. यासंपूर्ण प्रकरणाची सत्यपरिस्थिती मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिली आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनासही पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नगरविकास विभागानेही प्रस्ताव मागविला असून, सदर प्रस्ताव लवकरच नगरविकास विभागाकडे सादर होणार आहे. परंतु, हा प्रश्न निकाली लागण्याच्या स्थितीत असताना यावर सकारात्मक कार्यवाही होत असताना यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. वास्तविक सदर स्टुडीओची जागा सन १९४७ दरम्यान संस्थान काळात संस्थानातील मंत्री रावसाहेब बागवे यांनी भालजी पेंढारकर यांना खरेदीपत्रकाने विक्री केली. सदर विक्रीचा ठराव जी.आर.डी.१३२ ने मान्यता देत याची सनद केली होती. सन १९५० मध्ये भालजी पेंढारकर यांनी इंडियन सिटीझन बँकेकडून कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने सन १९६० मध्ये या जागेचा लिलाव काढला. तीनवार झालेल्या या लिलावातील पहिल्या दोन लिलावात लता मंगेशकर सहभागी न्हवत्या. सदर जागेचे व्यापारीकरण न होता ही जागा चित्रपट निर्मितीसाठीच रहावी, अशी विनंती त्यावेळी लोकांनी लता मंगेशकर यांच्याकडे करत लिलावात सहभागी होण्याची विनंती केली. लोकांच्या विनंतीला मान देवून लता मंगेशकर यांनी लिलावात भाग घेवून सर्वात जास्त बोली लावून स्टुडीओची जागा खरेदी केली. यास मे.न्यायालयामार्फत खरेदी मान्यता देण्यात आली आहे. अशी सत्यपरिस्थिती असताना लोकांच्यात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मीही कार्यकर्त्याचा आमदार झाल्याने चळवळीची जाण आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक चळवळीत आपला सहभाग आहे. त्यामुळे जनभावनांचा अनादर होणार नाही. पुढच्या आठवड्यात पुन्हा नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकासकांना पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा शासन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यापुढेही जावून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून या जागेत चित्रिकरणासाठी व कलाकारांसाठी आवश्यक बाबी पुरवून स्टुडीओचा विकास करण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत आवाहन केले.यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आर.के.पोवार, बाबा पार्टे, महामंडळाचे रणजीत जाधव, सचिन बिडकर, महेश पन्हाळकर, मिलिंद आष्टे, अमोल मोरे आदी सभासद व कलाकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments