साईश्री हॉस्पिटलमध्ये ८७ वर्षीय रुग्णावर स्वयंचलित रोबोटिक प्रणालीद्वारे दोन्ही गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर/प्रतिनिधी- साई श्री हॉस्पिटल मध्ये 87 वर्षे रुग्णावर स्वयंचलित रोबोटिक प्राणी द्वारे दोन्ही गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अशी माहिती साईश्री हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ नीरज आडकर याांनी दिली आहे.डॉ नीरज आडकर म्हणाले की, “श्री सुधाकर पंचवाघ हे या शस्रकियेसाठी फिट होते त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर ही शस्रकिया केली. अशा प्रकारच्या शस्रक्रिया योग्य वयातच करणे गरजेचे असते त्यासाठी अधिक वेळ घालवणे चुकीचे ठरू शकते. वाढत्या वयानुसार रिकव्हरी देखील कमी प्रमाणात होत असते”. दरम्यान, पुणे येथील कोथरूड मध्ये राहणारे ८७ वर्षीय आजोबा श्री सुधाकर पंचवाघ यांना गेल्या १५ वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना होत होत्या तसेच गेल्या १० वर्षांपासून त्यांच्या दोन्ही गुडघ्यात डेफ्रॉमिटी देखील आली होती. त्यांना चालताना व पायऱ्या चढ-उतार करताना गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना होत असत व दिवसेंदिवस या वेदना वाढत चालल्या होत्या. त्यांनी घरगुती तसेच अनेक रुग्णालयात या दुखण्यावर उपचार केले परंतु त्यांना हवा तसा त्यांना आराम पडला नाही.दरम्यान डॉ.नीरज आडकर व त्यांच्या टीमने साईश्री हॉस्पिटल पुणे येथे श्री सुधाकर पंचवाघ यांच्या गुडघ्यांवर भारतातील पहिलीच क्यूवीस ऑटोमेटेड जॉईंट रिप्लेसमेंट प्रणालीचा वापर करून दोन्ही गुडघा बदलीची शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे एकाच दिवशी दोन्ही गुडघ्यांवर रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया डॉ नीरज आडकर यांनी केली .या प्रणालीमुळे केलेल्या शस्त्रकियेच्या २४ तासांनंतर श्री सुधाकर पंचवाघ यांना चालत यायला लागले व केवळ तीन दिवसात त्यांना हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले .असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.