असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर /प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियनसाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया(ए. पी.आय) कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन-२०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल सयाजी येथे येत्या शनिवारी ३० एप्रिल व रविवारी १ मे रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहूल दिवाण, उपाध्यक्ष डॉ. रूपाली कापले, सचिव डॉ. अमोल खोत, संयुक्त सचिव डॉ. विद्या पाटील, डॉ. अभिजित गणपुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वैद्यकीय परिषदेसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने चार गुण प्रदान केले आहेत.
सदर परिषदेमध्ये ३० एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पोस्टग्रज्युएट विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरी सत्र घेण्यात येणार आहे. तसेच दोन दिवस दिवसांमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. अधिवेशनामध्ये रूग्णांमध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आजारावर निरनिराळ्या क्षेत्रातील यामध्ये सुप्रसिद्ध डॉ. आनंद अलूरकर, डॉ. नितीन अभ्यंकर, डॉ. मनीष माळी, डॉ. मोहन मगदूम, डॉ. राजेश धोपेश्वरकर, डॉ. दिलीप कदम, डॉ. परिक्षित प्रयाग,डॉ.शितल मयात्रा, डॉ. संदीप नेमानी, डॉ. पूर्णिमा पाटील या तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच रविवारी दुपारी डॉ. विनय थोरात यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. डॉ. एस.के.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ डॉ. विनय थोरात हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून तसेच विविध राज्यातून तीनशेहून अधिक चिकित्सक उपस्थित राहणार आहेत.पत्रकार परिषदेस डॉ.अक्षय बाफना,डॉ.गिरीश हिरेगौडर,डॉ.बुद्धिराज पाटील उपस्थित होते.